Ad will apear here
Next
मासवण आश्रमशाळेत रंगला ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’


पालघर : साहित्यविषयक रुची व ज्ञान वाढीस लागावे आणि आपली बोली भाषा जतन व्हावी म्हणून वसई येथील शब्दांगण प्रस्तुत ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’ या उपक्रमाचा २४वा प्रयोग  पालघर येथील मासवण आश्रमशाळेत झाला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मराठी भाषा व महत्त्व यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शाळेतील शिक्षकही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मासवण गावातील सरपंच आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चहाडे गावातील साहित्याची आवड असलेले कवी भालचंद्र पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या  स्वलिखित कविता सादर केल्या.

या कार्यक्रमादरम्यान कविता, खेळ, गप्पा, प्रश्नोत्तरे, गद्य-पद्य, नाट्यावलोकन, लोकगीत असा निखळ व मनमोकळा ‘शब्दांचा शब्दांशी संवाद’ विद्यार्थ्यांशी साधण्यात आला. कवयित्री शीतल संखे, श्वेता म्हात्रे, अनुजा संखे, संध्या सोंडे, शिल्पा परुळेकर, अक्षता देशपांडे, पूजा सावंत, कवी संजय पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या. या वेळी मुख्याध्यापक श्री. पवार, शिक्षक उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZYHBY
Similar Posts
आशा जाधव शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित वसई : तालुक्यातील कामण केंद्रातील खिंडीपाडा जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिका आशा चिंतामण जाधव यांना सन २०१८-१०१९ वसई तालुकास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आशियातील सर्वाधिक वजनदार महिलेने कमी केले २१४ किलो वजन मुंबई : आशियातील सर्वांत वजनदार महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यातील वसई येथील ४२ वर्षांच्या अमिता राजानी यांनी २१४ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे आता त्यांना सर्वसामान्य आयुष्य जगता येणे शक्य झाले आहे. अमिता यांच्यावर चार वर्षांपूर्वी बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्यांचे
पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात भिवंडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या २०१५पासून सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत शिक्षणात होणाऱ्या बदलांवर चिकित्सा व्हावी व शिक्षकांना योग्य माहिती मिळावी म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा शैक्षणिक केंद्राची मासिक शिक्षण परिषद पडघा-समतानगर बोरिवली जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकतीच पार पाडली.
प्रा. विकास उबाळेंना अर्थशास्त्राची डॉक्टरेट भिवंडी : बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विकास उबाळे यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language